Modi Eli Rojgar Yojana 2025 : केंद्र सरकारने नुकतीच “रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना” (Employment Linked Incentive Scheme – ELI) सुरू केली असून ही योजना देशातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
ही योजना अशा तरुणांसाठी आहे जे पहिल्यांदाच नोकरी करणार आहेत आणि ज्यांच्याकडे अनुभव नाही. पुढील दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य असून सरकारने यासाठी 1 लाख कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.
कशा प्रकारे मिळेल लाभ?
या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या तरुणांना अनुदान स्वरूपात एका महिन्याच्या पगाराइतकी रक्कम मिळेल. ही रक्कम 15,000 रुपयांपर्यंत असेल आणि दोन टप्प्यांत दिली जाईल – पहिला हप्ता 6 महिन्यांनी आणि दुसरा 12 महिन्यांनी. हे अनुदान थेट कंपन्यांना दिले जाईल, ज्यामुळे त्या नव्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवू शकतील.
उत्पादन क्षेत्रावर भर
केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार, उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. टिकाऊ रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकार अशा कंपन्यांनाही सहाय्य करणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना किमान 2 वर्ष नोकरीवर ठेवतात. अशा कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यावर दरमहा 3000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
ELI योजना का आहे विशेष?
- अनुभव नसलेल्या नवोदित तरुणांसाठी संधी
- कंपन्यांना नवीन उमेदवार ठेवण्यासाठी प्रोत्साहन
- रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षेला चालना
- उत्पादन क्षेत्रात वाढ
- तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न
मंत्रिमंडळातील इतर निर्णय
या योजनेसोबतच RDI (संशोधन, विकास आणि नवोन्मेष) योजनेलाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे खाजगी क्षेत्रात संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय तामिळनाडूत परमकुडी-रामनाथपुरम महामार्ग 4-लेनमध्ये रूपांतरित करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली आहे.