Mhada lottery 2025 Nashik Sambhajinagar 5 lakh homes : घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईमुळे घर घेणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. पण आता घर घेणं अधिक सुलभ होणार आहे, कारण म्हाडाकडून Nashik आणि Chhatrapati Sambhajinagarमध्ये नवीन घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी आखण्यात आली आहे.
Table of Contents
कुठे मिळणार घरं?
- नाशिक विभागात: १४८५ घरांसाठी लॉटरी.
- छत्रपती संभाजीनगरमध्ये: १३५१ घरांची उपलब्धता.
घरे कितीच्या दरात?
- घरांची किंमत फक्त ₹५ लाखांपासून सुरू होते.
- नाशिकमधील अल्प उत्पन्न गटासाठी घरे – किंमत ₹१२.६८ लाख ते ₹१३.५५ लाख.
- अडगावमधील ‘प्रणव गार्डन’ – किंमत ₹११.९४ लाख ते ₹१५.३१ लाख.
- अहिल्यानगरमधील सावेदी व सिव्हिल हुडको – फक्त ₹५.४८ लाखांपासून.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे आणि किती किंमतीची घरे?
- नक्षत्रवाडी: १०५६ घरे – ₹१५.३० लाख.
- चिखलठाणा: १५८ घरे – ₹२७ लाख.
- देवळाई: १४ घरे – ₹१३.१९ ते ₹१६.१९ लाख.
- आनंदपार्क: १८ घरे – ₹४.८७ ते ₹६.२७ लाख.
- बीड (अंबाजोगाई): ९२ घरे – ₹१०.६५ लाख.
- चिखलठाण्यातील विशेष घरे: ६ घरे – ₹३४ लाख.
अर्जाची तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख: ३० जून २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ ऑगस्ट २०२५
- पैसे भरण्याची अंतिम तारीख: १२ ऑगस्ट २०२५
- अर्ज यादी जाहीर: १८ ऑगस्ट २०२५ (दुपारी २ वाजता)
- अंतिम पात्र यादी: २५ ऑगस्ट २०२५
टीप: ही संधी विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.