MHADA Lottery 2025 अर्ज प्रक्रिया – घरासाठी फॉर्म कसा भरायचा ते येथे जाणून घ्या

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 20, 2025
MHADA Lottery 2025 अर्ज प्रक्रिया – घरासाठी फॉर्म कसा भरायचा ते येथे जाणून घ्या

स्वतःचे घर खरेदी करण्याची संधी, अर्ज प्रक्रिया इथे जाणून घ्या!

Mhada Lottery 2025 Form Process : घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी MHADA कडून आनंदाची बातमी आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडून ५,६३२ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही घरे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी आहेत.
ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्यात घर खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

MHADA Lottery 2025 अर्ज कसा करायचा?

  1. MHADA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
    https://lottery.mhada.gov.in
  2. ऑनलाईन नोंदणी करा:
    • नाव
    • मोबाईल क्रमांक
    • ईमेल आयडी
    • उत्पन्न गटाची माहिती
  3. लॉगिन करा आणि आपल्याला हवी असलेली योजना निवडा.
  4. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  5. अनामत रक्कम ऑनलाइन भरावी.
  6. सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.

📋 MHADA Lottery 2025 साठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. डोमेसाईल प्रमाणपत्र (स्थायिकतेचा पुरावा)
  4. उत्पन्नाचा दाखला (संबंधित गटासाठी)
  5. बँक पासबुक/स्टेटमेंट
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. स्वतःच्या स्वाक्षरीचा फोटो

महत्त्वाचे: सर्व कागदपत्रे PDF किंवा JPEG स्वरूपात अपलोड करावीत.

ℹ️ अधिक माहितीसाठी

👉 https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा