Mhada Konkan Lottery 2025: कोण अर्ज करू शकतं? ‘हे’ माहित नसल्याने अनेकजण संधी गमावतात!
मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा (MHADA) कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून तब्बल 5,632 घरे आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांना 13 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
कोण अर्ज करू शकतो?
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत:
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे उत्पन्न खालील गटांनुसार असावे:
गट | मासिक उत्पन्न |
---|---|
अत्यल्प | ₹25,000 पर्यंत |
अल्प | ₹25,001 – ₹50,000 |
मध्यम | ₹50,001 – ₹75,000 |
उच्च उत्पन्न | ₹75,001 किंवा त्यापेक्षा अधिक |
अर्ज प्रक्रिया व लॉटरीसंबंधित महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
- ठेव रक्कम भरण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
- पहिली पात्र यादी प्रसिद्ध होणार: 21 ऑगस्ट 2025 (संध्याकाळी 6:00 वाजता)
- दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025 (संध्याकाळी 6:00 वाजता)
- अंतिम पात्र यादी जाहीर: 1 सप्टेंबर 2025 (संध्याकाळी 6:00 वाजता)
- लॉटरीचा ड्रॉ (सोडत) काढण्याचा दिवस: 3 सप्टेंबर 2025 (सकाळी 10:00 वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात)
महत्त्वाचं लक्षात घ्या:
अनेकजण आवश्यक माहितीच्या अभावामुळे म्हाडा लॉटरीपासून वंचित राहतात. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपल्या उत्पन्न गटाची आणि इतर पात्रतेची खातरजमा जरूर करून घ्या.