Mati Parikshan Anudan 2025 : तुमची दहावी पूर्ण झाली आहे आणि रोजगारासाठी शहराकडे पाहत आहात? तर आता गावातच चांगला व्यवसाय सुरू करण्याची संधी आली आहे. राज्य सरकार दहावी पास तरुण-तरुणींना दीड लाख रुपयांचे अनुदान देत आहे. हे अनुदान मिळवून तुम्ही स्वतःची माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करू शकता.
Table of Contents
सरकारी योजनेचा मोठा फायदा
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत “मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष २०२५-२६” या योजनेत जिल्ह्यात एकूण १५ माती परीक्षण केंद्र उभारली जाणार आहेत. हे केंद्र गाव पातळीवर असतील, म्हणजे गावातील तरुणांनाच या व्यवसायाची संधी मिळेल. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी सरकार एक लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देत आहे.
माती परीक्षण म्हणजे काय?
साधे भाषेत सांगायचे तर, शेतकरी आपल्या शेतातील मातीचे नमुने घेऊन येतात. या नमुन्यांची तपासणी करून त्यांना सांगितले जाते की त्यांच्या शेतातील मातीत कोणती पोषक तत्त्वे आहेत, कोणती कमी आहेत. यावरून शेतकरी समजू शकतो की त्याला कोणते खत द्यावे लागेल आणि कोणती पिके घ्यावी लागतील.
कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फक्त दहावी पास असणे पुरेसे आहे. वयाची मर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था, कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, बचतगट, खत विक्रेते, शाळा-महाविद्यालय, युवक-युवती अशा सर्वांना संधी आहे.
जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय आणि त्याचे महत्व
कुठे आणि कधी अर्ज करावा?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद परीक्षण अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जावे लागेल. अर्जाची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा!
कमाईची चांगली संधी
प्रत्येक प्रयोगशाळा वर्षभरात तीन हजार माती नमुन्यांची तपासणी करू शकेल. पहिली ३०० तपासणी करण्यासाठी सरकार प्रति नमुना ३०० रुपये देईल. पुढील ५०० नमुन्यांसाठी २० रुपये प्रति नमुना मिळेल. उर्वरित दोन हजार २०० नमुन्यांची तपासणी तुम्ही शेतकऱ्यांकडून शुल्क घेऊन करू शकता. म्हणजेच हा एक चांगला व्यवसाय बनू शकतो.
का महत्त्वाची आहे ही योजना?
आजकाल शेतकरी अधिक उत्पादन घेण्यासाठी जास्त खत वापरतात. पण योग्य माती परीक्षण न केल्यामुळे ते चुकीचे खत वापरतात. यामुळे त्यांचे नुकसान होते आणि मातीचेही नुकसान होते. या प्रयोगशाळांमुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तरुणांना रोजगारही मिळेल.
तर मग का थांबता? लगेच अर्ज करा आणि गावातच स्वतःचा व्यवसाय सुरू करा!