आता प्रत्येक शेताला रस्ता; महाराष्ट्र शासनाची नवी समग्र योजना जाहीर


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Maharashtra Shet Rasta Samagra Yojana Update : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आता प्रत्येक शेताला रस्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, राज्यातील सर्व शेतांपर्यंत रस्ते पोहोचण्यासाठी शासन एक समग्र योजना तयार करणार आहे.

या योजनेत विविध विभागांच्या निधीचा समन्वय केला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार होईल आणि ती एक महिन्यात उपाययोजनांचा अहवाल सादर करेल.

मुख्यमंत्री म्हणाले की,

  • शेत रस्ते करताना कौशल्यावर आधारित काम आवश्यक असल्यास, संबंधित योजनांचा निधी एकत्र करून काम पूर्ण केले जाईल.
  • २५-१५ योजनेतील ५०% निधी शेत रस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय होणार आहे.
  • शेतरस्त्यांची प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित ठेवली जातील.
  • शेतरस्त्यांची रुंदी किमान १२ फूट ठेवण्यात येईल.
  • जमाबंदी आयुक्तांमार्फत शेत रस्त्यांना क्रमांक देण्याची कार्यवाही केली जाईल.
  • शेतरस्त्यांसाठी रोजगार हमी योजना, ग्रामविकास व महसूल विभाग यांच्याशी चर्चा करून स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केले जाईल.

तसेच, चालू रस्त्यांचे सर्वेक्षण, नकाशावर नोंदणी, लोक अदालती घेणे आणि रस्त्यांचे सपाटीकरण यासाठीही पावले उचलली जाणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सोयीचे रस्ते मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.