Maharashtra Heavy Rainfall Record Damage : महाराष्ट्रातील शेतकरी दोन आठवड्यांपूर्वी पावसासाठी आकाशाकडे पाहत होते, पण आता त्याच पावसाने राज्यात कहर केला आहे! बंगालच्या उपसागरातून आलेल्या सलग दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जबरदस्त पाऊस कोसळला आहे.
Table of Contents
राज्यात पावसाने मोडले सर्व रेकॉर्ड!
राज्यात आतापर्यंत ७७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या ९६ टक्के इतका आहे. ऑगस्टपर्यंतची सरासरी पावसाने पूर्ण केली आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १७ जिल्ह्यांतील १९२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
तुमच्या विभागात किती पाऊस? पाहा संपूर्ण यादी
विभागनिहाय पावसाचे प्रमाण (टक्के):
- छत्रपती संभाजीनगर: ११३%
- नागपूर: १०१%
- अमरावती: १००%
- कोकण: ९२%
- पुणे: ७९%
- नाशिक: ७६%
मोठी बातमी! राज्यात जमीन मोजणी आता झटपट होणार, येतायत १२०० नवीन रोव्हर मशीन
का झाला इतका जबरदस्त पाऊस? जाणून घ्या खरं कारण
जुलै-ऑगस्टमध्ये पावसाची कमतरता होती. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेने पिके सुकू लागली होती. पण १५ ऑगस्टच्या आसपास मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरात १८ अंश उत्तरेकडे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. हे क्षेत्र राज्याच्या मध्यभागातून गेल्याने मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर भरपूर पाऊस झाला.
चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरावर उत्तरेकडे आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र बनलं. हे पश्चिमेकडे सरकल्यानं मॉन्सूनचे वारे जोरदार सक्रिय झाले. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी स्पष्ट केलं.
पुढील पाच दिवसांत काय अपेक्षा?
हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे की, पुढील पाच दिवसांत पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
पावसाचा कहर: जनहानी आणि नुकसानीचे धक्कादायक आकडे
दुःखद बातमी – जनहानीची नोंद
चंद्रपूर: दोन वेगवेगळ्या घटनांत बुडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
बीड: धारूर-आवरगाव येथील वाण नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अनिल बाबुराव लोखंडे यांचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला.
अहिल्यानगर: धायतडकवाडी शिवारात पुरात वाहून गेलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह सापडला.
भयानक नुकसान
जळगाव: वासरे गावात (ता. अमळनेर) अतिवृष्टीचा फटका बसला. घरांत पाणी शिरल्यानं सुमारे ८५ कुटुंबांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या. या कुटुंबांचं संपूर्ण संसार पाण्यात तुंबून गेलं आहे.
पावसाने आणलेला आनंद आणि त्याचाच कहर – हीच आहे महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती!