—Advertisement—

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना: यादी जाहीर, आता कागदपत्रे अपलोड करा

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 30, 2025
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना: यादी जाहीर, आता कागदपत्रे अपलोड करा

—Advertisement—

Mahadbt Krushi Yantrikikaran Lottery List : कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची यादी महाडीबीटी पोर्टलवर जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना त्याबाबत मॅसेजद्वारे सूचना दिल्या गेल्या असून, निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पुढील सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, पॉवर टिल्लर, कडबा कटर यांसारख्या विविध कृषि यंत्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाइन अर्जांची लॉटरी काढून अंतिम लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कागदपत्रांची यादी:

  • 7/12 उतारा
  • होल्डिंग प्रमाणपत्र
  • निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन
  • टेस्ट रिपोर्ट
  • ट्रॅक्टर चलित यंत्र असल्यास आरसी बुक

ही सर्व कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर, पूर्वसंमतीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर अनुदान वितरित केले जाईल.

जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी:
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FundDisbursedReport या लिंकवर क्लिक करा. तिथे “निधी वितरित लाभार्थी यादी” हा पर्याय निवडून जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यानंतर आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासता येईल.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp