Lek Ladaki Yojana Maharashtra : मुलींना राज्य सरकार देणार 1 लाख 1 हजारांची मदत, तुम्हाला कसा मिळणार लाभ? संपूर्ण प्रक्रिया वाचा


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Lek Ladaki Yojana Maharashtra Sampurn Mahiti : सध्या राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बेहन योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेचा सध्या राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. त्यामुळे साहजिकच अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज भरले आहेत. या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मुलींच्या मदतीसाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार लाभार्थी मुलींना सुमारे 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या योजनेची अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व निकष सांगणार आहोत. या माहितीनंतर लाभार्थी मुलींनी अर्ज भरून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.

योजनेचा उद्देश काय आहे?

पैशाअभावी राज्यातील अनेक मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही. त्यामुळे ते लवकर लग्न करतात. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. राज्यातील पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पैसे कसे मिळवायचे?

या योजनेनुसार मुलीच्या जन्मावर 5000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर तिला सरकारकडून 4000 रुपयांची मदत मिळणार आहे. सहावीला जाण्यासाठी 6000 रुपये, 11वीला गेल्यावर 8000 रुपये. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर राज्य सरकार 75,000 रुपयांची मदत करेल. अशा प्रकारे, मुलीला एकूण 1,01,000 रुपये (एक लाख एक हजार रुपये) ची मदत मिळेल.

फायदा कोणाला होणार?

  • ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी लागू असेल.
  • लाभार्थी कुटुंबात मुलगा व मुलगी असल्यास त्या मुलीला योजनेचा लाभ मिळेल.
  • दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीदरम्यान मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाला तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. मात्र यानंतर मुलीच्या पालकांपैकी एकावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
  • या योजनेसाठी अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी पहिल्या मुलीच्या तिसऱ्या तिमाहीचे आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या तिमाहीचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी लागू आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा पुरावा
  • लाभार्थीचा जन्म दाखला
  • लाभार्थीचे आधार कार्ड (तुम्ही पहिल्यांदा लाभ घेतल्यास ही अट लागू होणार नाही)
  • पालकांचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासाठी अभ्यास प्रमाणपत्र
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • शेवटचा हप्ता घेताना मुलीचे लग्न झालेले नसावे.

10 वर्षांनंतर नोकरी सोडल्यास थेट दरमहा मिळणार 10 हजार रुपये, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; या नवीन योजनेला दिली मान्यता

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.