लाडकी बहीण योजनेत 14 हजार पुरुष लाभार्थी? आदिती तटकरे यांचं मोठ विधान!

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजनेचा तब्बल १४ हजारांहून अधिक पुरुषांनी गैरफायदा घेतला असल्याचा प्रकार समोर आला आहे. निधी वाटपातील या घोटाळ्यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि गरज पडल्यास संबंधित अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 30, 2025
लाडकी बहीण योजनेत 14 हजार पुरुष लाभार्थी? आदिती तटकरे यांचं मोठ विधान!
— Ladki Bahin Yojana Purush Labharthi Karvai

Ladki Bahin Yojana Purush Labharthi Karvai : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि गरज पडल्यास कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सूचित केलं.

आदिती तटकरे म्हणाल्या, “या योजनेतून अनेक महिलांना आनंदाचे क्षण मिळाले. मात्र काही पुरुषांनी अर्ज भरल्याचं समोर आलं आहे. योजनेची घोषणा 28 जून रोजी झाली आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. या कालावधीत काही महिलांच्या खात्याऐवजी कदाचित पुरुषांचे खाते दिलं गेलं असेल, पण याबाबतची तपासणी सुरू आहे.”

तटकरे पुढे म्हणाल्या, “महिलेचे स्वतःचे खाते नसल्यामुळे पुरुषांचे खाते वापरण्यात आले असेल, अशी शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात पुरुषांनी अर्ज भरले का, याची खात्री छानणीनंतरच होणार आहे. यापूर्वी अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत, आणि त्याच पद्धतीने चुकीचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.”

तटकरे यांनी एक गंभीर मुद्दा उचलला – “एका व्यक्तीने तब्बल 30-35 बँक अकाऊंट योजनेला जोडले होते, अशा प्रकरणांमध्ये आम्ही संबंधित अकाऊंट्स सील केले आहेत. कोणताही अपात्र व्यक्ती लाभ घेऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”

या सगळ्या पार्श्वभूमीवर, जर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा जाणीवपूर्वक गैरवापर केला असेल, तर त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp