Ladki Bahin Yojana June Installment Update : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा जून महिन्याचा सन्मान निधी आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये उद्यापासून निधी जमा होईल. अनेक लाभार्थिनींना या हप्त्याची प्रतिक्षा होती, आणि ती आता संपली आहे.
हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा झाली का, कसे तपासाल?
बँकेमध्ये जाऊन पासबुकवर एन्ट्री करून तुम्ही खात्यात पैसे जमा झालेत का ते पाहू शकता. याशिवाय मोबाइल बँकिंग किंवा UPI अॅप्समधूनही खाते तपासणी करता येईल.
कर्जाच्या अफवांवर पडदा
काही माध्यमांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशी कोणतीही कर्ज योजना राबवली जाणार नाही.
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई
योजनेचा गैरवापर करणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांनी मिळवलेला सुमारे ३ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे. याआधीही २,६५२ महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.