Ladki Bahin Yojana July Installment Date : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर
लाडकी बहीण योजनेचा १३वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच ५ ऑगस्टपर्यंत, ₹१५०० रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल.
जुलैचा हप्ता कधी जमा होणार?
या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांना ₹१५०० मिळतात. जूनपर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असून, जुलैच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतिक्षा सुरू आहे. याआधी देखील हप्ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच आले होते. त्यामुळे यावेळीही तसेच होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेला १ वर्ष पूर्ण
ही योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यभरातील २ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र अलीकडे पडताळणीच्या प्रक्रियेमुळे काही अपात्र महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.
१० लाख महिलांचे अर्ज बाद
महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योजनेतून सुमारे १० लाख महिलांचे अर्ज निकषांवर न बसल्याने बाद करण्यात आले आहेत. त्यानंतर आता नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
सूचना:
लाडकी बहिणींनी त्यांचे बँक खाते तपासत राहावे. हप्ता कधीही जमा होण्याची शक्यता आहे. जुलै अखेरीस रक्कम येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वरील माहिती अधिकृत संकेतस्थळ आणि खात्रीशीर सूत्रांवर आधारित असून, यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो.