मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – जून हप्ता रखडला?
Ladki Bahin Yojana Final List Name Check : महाराष्ट्र शासनाने २०२४ च्या अर्थसंकल्पात सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. गेल्या काही महिन्यांपासून नियमित हप्ता जमा होत असला, तरी जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही, अशी तक्रार आली आहे.
सरकारकडून सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असून काहींना यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे तुमचंही नाव वगळलं गेलंय का? हे तपासणं गरजेचं आहे.
Table of Contents
आपलं नाव यादीत आहे का? जाणून घ्या अशा:
- लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ‘अंतिम यादी (Final List)’ विभाग निवडा.
- आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- मोबाईलवर आलेला OTP कोड भरा.
- योजनेतील अंतिम यादी स्क्रीनवर दिसेल.
- त्यात आपलं नाव आहे की नाही, ते तपासा.
महत्त्वाची माहिती:
- काही अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं समोर आल्यानं सरकारने यादी पुनर्रचित केली आहे.
- नवीन निकष लागू केल्यामुळे काही महिलांना लाभ बंद झाला आहे.
- ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत, त्यांनी आपलं नाव अंतिम यादीत तपासणं आवश्यक आहे.
टीप: ही माहिती सर्वसामान्यांसाठी असून, कोणतीही अधिकृत तक्रार असल्यास जिल्हा प्रशासन किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा.