लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा! eKYC साठी पुन्हा मिळू शकते संधी

Author Picture
Published On: May 10, 2026
लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा! eKYC साठी पुन्हा मिळू शकते संधी
— लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! eKYC साठी मिळू शकते मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ईकेवायसी पूर्ण न केल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांचे हप्ते थांबवण्यात आले होते. मात्र आता महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मुदतवाढीची मागणी होत असून सरकार सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली होती. ज्या महिलांनी वेळेत ईकेवायसी पूर्ण केली, त्यांनाच योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात आला. तसेच ईकेवायसीमध्ये चुकीची माहिती असलेल्या महिलांना दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.

दरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही हजारो महिलांची ईकेवायसी बाकी असल्याचे समोर आले आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यातच जवळपास 1 लाख महिलांनी ईकेवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. यामुळे महिलांमध्ये चिंता वाढली असून त्यांनी प्रशासनाकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026

महिलांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे अर्ज करून आणखी एक संधी देण्याची विनंती केली आहे. राज्यभरातून अशाच मागण्या येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ईकेवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

तसेच लाडकी बहीण योजनेतील मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशीही माहिती समोर येत आहे. ईकेवायसी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना एकाच वेळी 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

सरकारकडून अंतिम निर्णय जाहीर होण्याची प्रतीक्षा असून, लाभार्थी महिलांनी वेळेत ईकेवायसी पूर्ण करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

नमस्कार! मी उदय लहासे. सरकारी योजना, शेती, टेक्नॉलॉजी आणि ताज्या अपडेट्स वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लोकांना योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, हा माझा उद्देश आहे. Gore Sarkar वर तुम्हाला उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती नियमित मिळेल.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा