Ladki Bahin Yojana Arj Radd 2025 : राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर अर्ज रद्द करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नव्या निकषांमुळे आणि चौकशीमुळे अनेक महिलांना दरमहा मिळणारे १५०० रुपये थांबणार आहेत.
Table of Contents
किती अर्ज रद्द झाले?
- जालना जिल्ह्यात:
५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले.
तपासणीअंती ५७,००० अर्ज बाद करण्यात आले.
४,८४,६९४ महिलाच योजनेंतर्गत पात्र ठरल्या. - नागपूर जिल्ह्यात:
१० लाख ७३ हजार महिलांनी अर्ज केले.
त्यातील ३०,००० अर्ज अपात्र ठरले.
अपात्र लाभार्थ्यांची ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
अर्ज अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे
- वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे
- कुटुंबात सरकारी नोकरी असणे
- स्वतःच्या किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असणे
- ठरलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे
- संजय गांधी निराधार किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ आधीच मिळवणे
- कागदपत्र पडताळणीमध्ये योग्य माहिती न देणे
सरकारी कारवाई व महत्वपूर्ण मुद्दे
- आयकर विभागाकडून अर्जदारांची छाननी करण्यात आली.
- सप्टेंबर २०२४ पासून नवीन नोंदणी बंद करण्यात आली आहे.
- ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांच्या खात्यात आर्थिक मदत बंद करण्यात येणार आहे.
- काही महिलांनी स्वयंस्फूर्तपणे योजनांचा लाभ घेणे थांबवले आहे.
महिलांमध्ये नाराजी
अर्जांच्या अपात्रतेमुळे आणि लाभ ठप्प झाल्यामुळे राज्यातील अनेक महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही योजना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत देखील महत्वाची ठरली होती.