—Advertisement—

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल: या महिलांना मिळणार नाही पुढचा हप्ता

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 24, 2025
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल: या महिलांना मिळणार नाही पुढचा हप्ता
— Ladki Bahin Yojana Apatra Mahila 2025

—Advertisement—

Ladki Bahin Yojana Apatra Mahila 2025 : लाडकी बहीण योजनेत मोठा फेरबदल करण्यात आला असून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. सध्या लाभार्थ्यांची पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, तर काहींचा पुढील हप्ताही थांबवला जाऊ शकतो.

कोणत्या कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवलं जात आहे?

  • काही कुटुंबांतील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केल्याचे आढळल्यास त्यांना योजना लाभ मिळणार नाही.
  • जन्मतारीख बदलून वय १८ वर्षे दाखवणाऱ्या महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे.
  • चारचाकी वाहन असलेल्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
  • अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज फेटाळण्यात येतो.
  • इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही योजनेमधून वगळले जात आहे.

ऑगस्टपासून होणार आणखी कारवाई

प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला माहिती दिल्यानंतर ऑगस्टपासून उच्च उत्पन्न गटातील महिलांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे आणखी अनेक महिलांना योजना बंद होण्याचा धोका आहे.

अपात्र ठरवलेल्यांसाठी शेरा

  • FSC Multiple in Family – एकाच घरातील एकापेक्षा जास्त अर्जदार
  • RTO Rejected – चारचाकी वाहन धारक
  • Other Scheme Beneficiary – इतर योजनांचा लाभ घेतलेले

पात्र असूनही लाभ बंद झाला? अशी करा तक्रार

जर तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असूनही तुमचा हप्ता थांबवण्यात आला असेल, तर तुम्ही खालील मार्गाने तक्रार करू शकता:

  1. ladkibahinyojana.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून Grievance Section मध्ये तक्रार नोंदवा.
  2. तुमच्या तालुक्यातील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन लेखी अर्ज करा.
Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp