लाडकी बहीण योजना: १२ वा हप्ता जमा, पण हजारो महिला अजूनही प्रतीक्षेत!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 13, 2025
लाडकी बहीण योजना: १२ वा हप्ता जमा, पण हजारो महिला अजूनही प्रतीक्षेत!

Ladki Bahin Yojana 12va Hapta Update : ‘माझी लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा ₹1500 चा 12 वा हप्ता जमा होण्यास 5 जुलैपासून सुरुवात झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यांनी स्पष्ट केलं की ज्या महिलांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत, अशा लाभार्थींना थेट बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल.

काही महिलांच्या खात्यांमध्ये ही रक्कम पोहोचली आहे, मात्र राज्यातील अनेक महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. यामागे विविध कारणे आहेत. सध्या अर्जांची पडताळणी सुरू असून, अटी व निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

काही महिलांना पूर्वी अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती कारण त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी होते. आता त्या पात्र वयोगटात आल्या असल्या तरी अर्ज प्रक्रिया बंद असल्यामुळे त्या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.

तांत्रिक त्रुटी, अपुरी माहिती, किंवा वेळेअभावी अनेक पात्र महिलांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे आता सरकारकडून अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. काही महिलांना नियमितपणे लाभ मिळत असतानाही अनेकांना निधी वेळेवर मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी लवकरात लवकर नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे.

योजना लाभ मिळालाय का? असे तपासा:

  1. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. ‘अंतिम यादी’ (Final List) या पर्यायावर क्लिक करा.
  3. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  4. मोबाईलवर आलेला OTP टाका.
  5. तुमचं नाव यादीत आहे की नाही, ते लगेच कळेल.
Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp