Ladki Bahin Yojana 12va Hapta Update : ‘माझी लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा ₹1500 चा 12 वा हप्ता जमा होण्यास 5 जुलैपासून सुरुवात झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यांनी स्पष्ट केलं की ज्या महिलांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत, अशा लाभार्थींना थेट बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल.
काही महिलांच्या खात्यांमध्ये ही रक्कम पोहोचली आहे, मात्र राज्यातील अनेक महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. यामागे विविध कारणे आहेत. सध्या अर्जांची पडताळणी सुरू असून, अटी व निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
काही महिलांना पूर्वी अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती कारण त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी होते. आता त्या पात्र वयोगटात आल्या असल्या तरी अर्ज प्रक्रिया बंद असल्यामुळे त्या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.
तांत्रिक त्रुटी, अपुरी माहिती, किंवा वेळेअभावी अनेक पात्र महिलांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे आता सरकारकडून अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. काही महिलांना नियमितपणे लाभ मिळत असतानाही अनेकांना निधी वेळेवर मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी लवकरात लवकर नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे.
योजना लाभ मिळालाय का? असे तपासा:
- ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘अंतिम यादी’ (Final List) या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाका.
- तुमचं नाव यादीत आहे की नाही, ते लगेच कळेल.