Krushi Samruddhi Yojana 2025 : राज्यातील शेतकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे.
‘कृषी समृद्धी योजना 2025’ असे या योजनेचे नाव असून, पुढील पाच वर्षांसाठी सुमारे २५,००० कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू होणार आहे.
राज्यात पूर्वीच्या पीक विमा योजनांमधील त्रुटी लक्षात घेऊन नव्याने सुधारित योजना राबवली जाणार आहे. ‘कृषी समृद्धी’ या योजनेचा उद्देश म्हणजे शेतीशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, आणि शेतकऱ्यांना नवीन संधी मिळवून देणे.
क्लस्टर आधारित शेतीस प्रोत्साहन
- शेतकरी गटांनी एकत्र येऊन शेती करणे प्रोत्साहित केले जाईल.
- इनपुट खर्चात बचत, प्रक्रियेस मदत, आणि मार्केटिंगसाठी सामायिक धोरण राबवले जाईल.
- सिंचन, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
- पारदर्शक यंत्रणा व काटेकोर अंमलबजावणीमुळे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
अनुदानाचे स्वरूप
- यांत्रिकीकरण, संरक्षित शेती (शेडनेट, पॉलीहाऊस), क्रॉप कव्हर, मल्चिंग पेपर, इत्यादीसाठी अनुदान उपलब्ध.
- विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना नाममात्र प्रीमियम भरावा लागतो (२%, १.५%, ५%). उर्वरित रक्कम शासनाकडून भरली जाते.
- क्लस्टर यादीतील गटशेतीस प्राधान्य दिले जाणार आहे.
कोण मिळवू शकतो लाभ?
- जमीनधारक शेतकरी, गटशेती करणारे, शेतकरी उत्पादक कंपन्या/संघ यांना लाभ मिळू शकतो.
- केंद्र शासनाच्या पात्रता निकषांनुसार लहान, मध्यम व मोठे शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत.