Table of Contents
सणासुदीच्या सीझनमध्ये सोने-चांदीने मारली इतिहासातील सर्वात मोठी उसळी
जळगाव – सणासुदीच्या हंगामात जळगावच्या सराफा बाजारातील सोने-चांदीच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. शनिवारी एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल १२०० रुपयांची तर चांदीच्या दरात ४५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर जळगावच्या सराफा बाजाराच्या इतिहासातील सर्वोच्च आहेत.jalgaon gold silver price hike 2025
या वाढीमुळे शनिवारी सोन्याचा भाव जीएसटीशिवाय १ लाख ४ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव जीएसटीशिवाय १ लाख २३ हजार रुपये प्रति किलोवर गेला आहे.
ग्राहकांच्या सणासुदीच्या खरेदीला फटका
सोने-चांदीच्या या आकाशी दरांमुळे सणासुदीत दागिने खरेदीचं प्लॅन करणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे. आता सोने-चांदीचं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून महिला ग्राहकांनी “आपली हौस कशी पूर्ण करायची?” असा सवाल उपस्थित केला आहे.
का वाढल्या किमती?
सराफा व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन डॉलरच्या किमतीवर टॅरिफ रेटचा परिणाम झाला आहे. तसेच फेडरल बँकेच्या आगामी बैठकीत व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्यामुळे सोने-चांदीच्या दरांवर याचा थेट परिणाम दिसत आहे.
जळगावच्या सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी पुष्टी केली आहे की हे दर इतिहासातील सर्वाधिक आहेत आणि पुढील काही दिवसांत या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.