GDS Bharti 2024 : भारतीय टपाल विभागाने (GDS) एकूण 44,228 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवारांसाठी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या ही एक उत्तम संधी आहे. टपाल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक] ची रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे सबमिट करावेत. भारतीय टपाल विभागाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरतीसाठी अर्ज सादर करणे 15 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करावेत. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 15 जुलै 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी. या भरतीबद्दल संपूर्ण तपशील, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
गृह मंत्रालयाची मोठी घोषणा, या नोकरीत माजी अग्निवीरांना या दलासाठी अनेक पदे राखीव
एकूण जागा : 44,228
पदाचे नाव
1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मूलभूत पात्रता प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयाची आवश्यकता: 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे
[ OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी: सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: 100/-
[SC/ST/PWD/महिलांसाठी : फी नाही]
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024
- अर्ज संपादन तारीख: 06 ते 08 ऑगस्ट 2024