भारतीय नोटांवर फक्त महात्मा गांधींचाच फोटो का? RBI ने सांगितलं कारण

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 6, 2025
भारतीय नोटांवर फक्त महात्मा गांधींचाच फोटो का? RBI ने सांगितलं कारण

Indian Currency Mahatma Gandhi Fhoto Reason : भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचेच चित्र दिसते, हे आपण सर्वजण जाणतो. मात्र, अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, इतर कोणीही महत्त्वाची व्यक्ती नसताना केवळ गांधीजींचाच फोटो का?

हा प्रश्न केवळ सामान्य नागरिकांपुरताच मर्यादित नाही, तर अनेक ठिकाणी या विषयावर चर्चा आणि वादविवादही झाले आहेत. यावर आता खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अधिकृत माहिती दिली आहे.

गांधीजींची निवड कशी झाली?

RBI च्या ‘RBI Unlocked: Beyond the Rupee’ या माहितीपटात सांगण्यात आलं की, भारतीय रुपयांवर कोणते चित्र असावे यावर विचार करताना रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासह अनेक थोर व्यक्तींची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटी सर्व सहमती महात्मा गांधी यांच्या नावावर झाली आणि त्यांचेच चित्र नोटांवर छापण्याचा निर्णय झाला.

प्रसिद्ध व्यक्तींचा फोटो का महत्त्वाचा?

आरबीआयने स्पष्ट केलं की, नोटांवर प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र असणे हे ओळखणं सोपं करतं. बनावट नोट ओळखण्यासाठी प्रसिद्ध चेहऱ्याचं चित्र सामान्य नागरिकांसाठी मदत करतं. त्यामुळे महात्मा गांधी यांचे चित्र या दृष्टीनेही योग्य मानले गेले.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर नोटांवरील बदल

  • ब्रिटिश काळात: त्यावेळी नोटांवर ब्रिटिश राजाचे प्रतीक, प्राणी, वनस्पती यांची चित्रं असायची.
  • स्वातंत्र्यानंतर: भारतात प्रगतीचं दर्शन घडवणारी चित्रं वापरली गेली. अशोक स्तंभ, विज्ञान आणि शेतीसंबंधित विषय यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रांचा समावेश करण्यात आला.

गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापला?

महात्मा गांधी यांचा फोटो पहिल्यांदा १९६९ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १०० रुपयांच्या विशेष नोटेवर छापण्यात आला. यानंतर १९८७ मध्ये त्यांच्या चित्रासह ५०० रुपयांची नियमित नोट सादर करण्यात आली. १९९६ मध्ये “महात्मा गांधी सिरीज” नावाने नव्या प्रकारच्या नोटा सुरक्षा वैशिष्ट्यांसह बाजारात आल्या.

आरबीआय रुपये देशभर कसे पोचवते?

RBI कडून प्रिंटिंग प्रेसमधून छापून आलेल्या नोटा देशभर पोहोचवण्यासाठी रेल्वे, विमान आणि जलमार्ग यांचा वापर केला जातो. हा प्रक्रिया पहिल्यांदाच RBI च्या माहितीपटातून उघड करण्यात आली आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा