Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम असे या योजनेचे नाव आहे. या योजनेमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.
नव्या पेन्शन योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम असे या योजनेचे नाव आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला. या योजनेनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले तर त्याला सेवानिवृत्तीपूर्वी 12 महिन्यांच्या सेवेसाठी मूळ वेतनाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त पेन्शन दिली जाईल. तसेच, 10 वर्षे काम करून जर त्याने नंतर नोकरी सोडली तर त्याला दरमहा 10,000 रुपये पेन्शन दिले जाईल. सरकारने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.
लखपती दीदी योजनेची संपूर्ण माहिती
पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शन रकमेच्या 60 टक्के रक्कम दिली जाईल. 10 वर्षे काम केल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास त्याला दरमहा 10,000 रुपये पेन्शन दिले जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. आज आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. NPS आणि UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना असेल. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, युनिफाइड पेन्शन योजनेंतर्गत महागाई भत्त्याचा लाभही मिळणार आहे.
ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे
येत्या काळात ही योजना कार्यान्वित होणार आहे. योजनेचे पाच स्तंभ आहेत. 50 टक्के खात्रीशीर पेन्शन हा या योजनेचा पहिला आधारस्तंभ आहे. खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन हा दुसरा आधारस्तंभ आहे. 10 वर्षांच्या सेवेनंतर दरमहा 10 हजार रुपये पेन्शन हा तिसरा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक बैठका झाल्या
ही पेन्शन लागू करण्यापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या जॉइंट कन्सल्टेटिव्ह मेकॅनिझम टीमसोबत अनेक बैठका घेतल्या. जगभरात कोणत्या प्रकारच्या पेन्शन योजना सुरू आहेत याचाही विचार केला. भारतीय अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारचे बजेट समजून घेण्यासाठी आम्ही आरबीआयशीही चर्चा केली. त्यानंतर आम्ही एकात्मिक पेन्शन योजना लागू केली, असेही वैष्णव यांनी सांगितले.