३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 23, 2024
३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद!
— If e-KYC is not completed by June 30 the ration will be closed!

Ration Card Update : स्वस्त धान्य वितरण योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ३० जूनची मुदतही देण्यात आली आहे. यानंतर ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्यांना रेशन मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित रेशन दुकानांवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता प्रत्येक शिधापत्रिकाधारक आणि त्यांच्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. तसे, सरकार दोन वर्षांपासून आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, सरकारच्या आवाहनाला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच ३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेशन कार्ड ऑनलाइन चेक करा असा काढा १२ अंकी नंबर

ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप रेशन दुकानावर आधार कार्ड लिंक केलेले नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे रेशन दुकानदार संघटनेने आधार रेशन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, शिधापत्रिकांच्या ई-केवायसीमुळे पात्र आणि अपात्र लाभार्थी शोधणे सोपे होईल. पात्र नसतानाही स्वस्त धान्याचा लाभ घेणारे हे बनावट लाभार्थी कोण हे आता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ज्यांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झाले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे जळगावचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.

घरबसल्या असे काढा ऑनलाइन रेशन कार्ड?

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा