जुनी वाहने असणाऱ्या वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन विभागाने आता यासाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे.
याआधी 30 जून 2025 ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी ही माहिती दिली आहे.
HSRP बसवण्यासाठी वाहनधारकांनी transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळ निश्चित करणं आवश्यक आहे. जे वाहनचालक 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट घेऊन HSRP प्लेट बसवतील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
15 ऑगस्टनंतर नियम मोडल्यास कडक कारवाई
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर 15 ऑगस्टनंतर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी वेळेत ही प्लेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
HSRP म्हणजे काय?
HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. या प्लेटमध्ये विशिष्ट कोड, राज्याचा संकेत, आणि कायमचा लॉक असतो. ही प्लेट गाडी चोरीपासून संरक्षण, ओळख पटवणे आणि ट्रॅकिंगसाठी उपयुक्त ठरते. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP लावणे कायद्याने बंधनकारक आहे.