16 हजार लोकांना नोटीस
Home Buying TDS News 2024 : गेल्या वर्षी, प्राप्तिकर विभागाने देशभरातील 16,000 हून अधिक घर खरेदीदारांना नोटिसा पाठवून मालमत्तेवर अतिरिक्त टीडीएस भरण्याचे आदेश दिले होते. प्राप्तिकर विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या मालमत्ता विक्रेत्यांचे पॅन कार्ड एकतर निष्क्रिय आहेत किंवा आधार क्रमांकाशी जोडलेले नाहीत. अशा स्थितीत मालमत्ता खरेदीदाराला अतिरिक्त कर भरावा लागणार आहे.
घर विकणाऱ्याकडे पॅनकार्ड नसणे किंवा ते निष्क्रिय राहणे याचे परिणाम मालमत्ता खरेदीदारांना भोगावे लागतात. अशा परिस्थितीत, आयकर विभागाने तात्काळ टीडीएस कपातीद्वारे घर खरेदीदारांना थोडा दिलासा दिला आहे आणि त्यासाठी विक्रेत्याला 31 मे 2024 पर्यंत त्यांचे पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करावे लागेल. जर विक्रेत्याने आधार क्रमांक आणि पॅन कार्ड लिंक केले तर , घर खरेदीदाराला वाढीव दराने अतिरिक्त TDS भरावा लागणार नाही. आयकर विभागाच्या अलीकडील परिपत्रकाद्वारे, मालमत्ता विक्रेत्यांनी 31 मे पर्यंत त्यांचे पॅन आणि आधार लिंक केल्यास घर खरेदीदारांना TDS कपातीच्या कर अधिसूचनेच्या बंधनातून दिलासा मिळेल.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा ‘या’ गोष्टी; आयुष्यात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही