Govind Maharaj Pimpalgaon Hareshwar Sampurn Mahiti : आषाडी निमित्त पिंपळगाव हरेश्वर याठिकाणी भव्यदिव्य यात्रा भरते अस एकूण होतो. पण आज साक्षात मी त्याच दर्शन माझ्या डोळ्यांनी पाहिलं…. पिंपळगाव हरेश्वर येथील आमचे पाऊणे गणेश मालकर यांनी आम्हाला या यात्रेसाठी बोलावलं. त्याठिकाणी गेल्यावर गावातील लोकांनी आम्हाला सांगितलं कीं, गोविंद महाराज हे संत तुकारामांचे अवतार होते. त्यांनी देखील अभंग रचले आहे. आणि त्या अभंगात तुकारामांचा उल्लेख आढळतो.
गोविंद महाराज यांचा जन्म जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावातला. त्यांचा जन्म १७८५ सालचा. लहानपणापासून विठ्ठलाची भक्ती करणं आणि त्याचा जप करणं हे आवडीने करायचे. शिवाय तुकारामांच्या अभंगाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हणायला हरकत नाही.
आषाढी एकादशीवेळी गावात मोठी जत्रा भरते. वेगवेगळ्या गावांतून दिंड्या येतात. भाविकांचं असं सांगणं आहे की, मंदिराच्या जवळून एक नदी वाहते(बहुळा?) त्या नदीकिनारी एक चिंचेचं झाड आहे. दरवर्षी प्रथेप्रमाणेत्या झाडाजवळ दुपारी बारा वाजता आरती होते. आषाढी एकादशीवेळी पंढरपूरचे मंदिर दुपारी बारा वाजता बंद होते त्याला कारण असे की त्यावेळी विठ्ठल खान्देशात येतो. आणि गोविंद महाराजांना दर्शन देतो. अशी धारणा लोकांत आहे.
बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते; उद्धरण, शुभेच्छा, तारीख, महत्व संपूर्ण माहिती.
मंदिरात गोविंद महाराजांची वंशावळ देखील आहे. त्यांचे वंशज शिवानंद महाराज त्याच गावात राहतात. मंदिराचे नाव जरी गोविंद महाराज असले तरी मंदिरात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आहे आणि मंदिराच्या सभामंडपात गोविंद महाराजांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेजवळ त्यांनी लिहिलेली अभंगाची प्रत असल्याचे सांगितले जाते. शिवाय त्यांचे निवडक अभंग देखील भिंतीवर लिहिलेले आहेत.
गोविंद महाराजांचे साहित्य म्हटलं तर त्यांनी दोनशे अठरा अभंग लिहिलेले आहेत तर एक हिंदी पद लिहिलं आहे. शिवाय विठ्ठलावर एक आरतीही त्यांनी रचलेली आहे. गोविंद महाराज एका अभंगात म्हणतात…
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आषाढीला वारीला जाणाऱ्या दिंड्यांना मिळणार ६८ लाख रुपये
अभंग करावे बहुत |माझी थोडकी बिशांत ||
अवघा आहे माझा नेम |दोनशे अभंगाचे काम ||
त्यांचच एक हिंदी पद आहे..
सद्गुरू रंगेला रंगेला |पिलाया सो हं भंगका पेला ||
पूर्व हमारा संचित आया |पकरी संतनकी कास |
संत संगिने घर बतलाया |जावे सद्गुरू के पास ||
त्यांचे दोनशे अठरा अभंग, सहा हिंदी पदं वं तीन दोहे? अशा एकूण दोनशे सत्तावीस रचनांचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्याला ‘श्री गोविंद महाराज संस्थान, उत्राण यांची अभंग-वाणी’ असे नाव दिले आहे.
गोविंद महाराजांची समाधी पिंपळगावातच आहे. अनेक दुकानांना गोविंद महाराजांची नावं दिलेली आढळतात. व इथल्या गावातील बहुतांश लोकांच्या घरात गोविंद महाराजांची प्रतिमा आहे.