Godam Bandhakam Anudan Yojana 2024 : विविध केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत, राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियानांतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांच्या बांधकामासाठी वास्तविक खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल.
सदर योजना बँक कर्जाशी संबंधित आहे आणि इच्छुक शेतकरी उत्पादक संघटना, कंपन्यांनी अर्ज सादर करावेत. त्यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसार डिझाइन, तपशील, खर्च अंदाजानुसार त्याच आर्थिक वर्षात बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त व नाममात्र किंमत आकारून साठवणुकीसाठी गोदामाचा वापर करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल
पूर्व-मंजूर कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर, त्यांना स्वीकार्य अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी, असोसिएशनच्या खात्यात वितरित केले जाईल. जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संघटना व कंपन्यांनी या योजनेचा अवलंब करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
येथे अर्ज करा
शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड, बँक खाते तपशील आदी कागदपत्रे 31 जुलैपूर्वी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.