जळगाव वासीयांसाठी खूशखबर! गोवा-जळगाव-हैदराबादसाठी दररोज सुरू होणार विमानसेवा…


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Jalgaon Airport flight Update : जळगावकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून जळगाव विमानतळावरून दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद विमानसेवा सुरू होणार आहे.

वास्तविक, उडान 5.0 योजनेअंतर्गत, फ्लाय91 एअरलाइन्सने जळगाव विमानतळावरून गोवा-जळगाव-हैदराबाद आणि गोवा-जळगाव-पुणे उड्डाणे सुरू केली आहेत. गोवा-जळगाव-हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर गोवा-जळगाव-पुणे विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे.

Fly91 कंपनीने आता हिवाळ्याचे वेळापत्रक तयार केले आहे, ज्यामध्ये गोवा-जळगाव-हैदराबाद हे विमान 27 ऑक्टोबर 2024 ते 29 मार्च 2025 पर्यंत दररोज धावणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता दैनंदिन उड्डाणे उपलब्ध होणार आहेत.

पुणे-मुंबई सेवा नियमित कधी सुरू होणार, याचीही नागरिकांना प्रतीक्षा आहे. जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता जळगाववासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे.

‘या’ जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटींचा पीक विमा, तारीख जाहीर; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.