—Advertisement—

फळ पीक विमा योजना 2025: अर्ज करण्याची मुदत वाढली, जाणून घ्या अंतिम तारीख

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 3, 2025
फळ पीक विमा योजना 2025: अर्ज करण्याची मुदत वाढली, जाणून घ्या अंतिम तारीख

—Advertisement—

Crop Insurance Scheme 2025 Deadline Extended : तकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ६ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

या योजनेअंतर्गत द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू आणि मोसंबी या फळपिकांचा समावेश आहे. पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम मुदत होती. मात्र २७ जूनपासून आधार संकेतस्थळासंदर्भात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे केंद्र शासनाने ४ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

  • Agri Stack नोंदणी क्रमांक
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • जमीन धारणा उतारा
  • Geo-tag फोटो
  • ई-पिक पाहणी (आवश्यक आहे)

टीप: ई-पिक नोंद नसल्यास अर्ज अमान्य ठरू शकतो. जुलै – ऑगस्टमध्ये ई-पिक नोंदणी करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या विमा कंपनी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp