EPFO चा मोठा निर्णय: आता PF मधून घरासाठी रक्कम काढता येणार

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 13, 2025
EPFO चा मोठा निर्णय: आता PF मधून घरासाठी रक्कम काढता येणार

Epfo Pf Home Downpayment Rule Change : EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नोकरदारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचारी आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. पीएफ फंड काढण्याच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे आता घर खरेदी करताना डाऊन पेमेंटसाठी पीएफमधून निधी काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार, ज्या कर्मचाऱ्यांचं पीएफ खाते किमान तीन वर्षे जुनं आहे, त्यांना आपल्या खात्यातील 90% पर्यंत रक्कम घर खरेदीसाठी काढण्याची संधी मिळणार आहे. यामुळे घर घेण्याचा निर्णय घेणाऱ्या नोकरदारांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळणार आहे.

फायनांशियल एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, घर खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि डाऊन पेमेंटची अडचण दूर करण्यासाठी EPFO कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासोबत EPFO ने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे – पीएफमधून रक्कम काढताना निवृत्तीनंतरचा फंड कमी होणार नाही, याची काळजी घ्या आणि योग्य आर्थिक नियोजन करूनच हा निर्णय घ्या.

खूप सारे नोकरदार हे स्वतःचं घर घेण्यासाठी उत्सुक असतात, पण डाऊन पेमेंटसाठी लागणारा निधी नसल्यानं अनेकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं. आता मात्र EPFO च्या या बदलामुळे हे स्वप्न साकार होण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर रिअल इस्टेट क्षेत्रालाही होणार असून, घरांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा