Duplicate Pan Card Kase Download Karayache : आजकाल प्रत्येक लहानसहान आर्थिक कामासाठी पॅन कार्ड लागते. बँकेत खाते उघडायचं असो, इनकम टॅक्स भरायचा असो किंवा कुठल्याही आर्थिक व्यवहाराची गोष्ट असो – पॅन कार्ड अनिवार्यच आहे. पण जर ते हरवलं, खराब झालं किंवा हरवल्यासारखं वाटत असेल, तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही! कारण आता तुम्ही फक्त ५ मिनिटांत घरबसल्या डुप्लिकेट ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
विशेष म्हणजे हे ई-पॅन कार्ड सर्व सरकारी व खाजगी ठिकाणी तितकंच वैध मानलं जातं.
Table of Contents
तुमचं पॅन कोणत्या एजन्सीकडून बनलंय, हे ओळखा!
भारतामध्ये मुख्यत्वे दोन एजन्सी पॅन कार्ड बनवतात – NSDL आणि UTIITSL. याशिवाय, आता आयकर विभागाची वेबसाइट देखील ‘इन्स्टंट पॅन’ सेवा देते.
तुमचं पॅन कार्ड नेमकं कुठल्या एजन्सीकडून बनलंय हे जाणून घेण्यासाठी:
- जुन्या पॅन कार्डवर बघा
- पॅन अर्ज करताना मिळालेला ईमेल किंवा SMS तपासा
हे लक्षात आलं की, मग तुम्ही त्या एजन्सीच्या वेबसाइटवर जाऊन लगेच ई-पॅन डाउनलोड करू शकता.
Aadhaar PVC Card : ATM कार्ड सारखे आधार कार्ड कसे मिळवायचे, पहा संपूर्ण प्रोसेस
👉 NSDL वरून ई-पॅन डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि जन्मतारीख टाका
- मोबाईल किंवा ईमेलवर आलेला OTP टाका
- एक छोटं ₹8.26 शुल्क भरावं लागेल
- पेमेंट झाल्यावर लगेच ई-पॅन डाउनलोड करता येईल
👉 UTIITSL वरून ई-पॅन डाउनलोड कसा कराल?
- गुगलवर ‘UTI PAN download’ सर्च करा
- अधिकृत वेबसाइटवर जा आणि ‘Download e-PAN’ निवडा
- पॅन नंबर, आधार नंबर आणि DOB भरा
- मोबाईलवर आलेला OTP टाका
- OTP पडताळणी झाली की, तुमचं ई-पॅन लगेच तयार!
आधार ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे; संपूर्ण प्रोसेस इथ बघा | How to Link PAN Card to Aadhaar In Marathi
👉 ‘इन्स्टंट ई-पॅन’ आयकर विभागाच्या वेबसाइटवरून
जर तुम्ही आधीच आधार नंबरद्वारे ‘इन्स्टंट पॅन’ काढला असेल, तर:
- Income Tax विभागाच्या वेबसाइटवर जा
- ‘Instant E-PAN’ विभागात जा
- पॅन व आधार क्रमांक टाका
- OTP टाकून लगेच ई-पॅन डाउनलोड करा
काही मिनिटांत मिळवा हरवलेलं पॅन!
वरीलपैकी कोणतीही पद्धत वापरून तुम्ही घरबसल्या, मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर काहीच वेळात तुमचं हरवलेलं किंवा खराब झालेलं पॅन कार्ड पुन्हा मिळवू शकता.
पैसे, बँकिंग आणि इतर कोणत्याही व्यवहारासाठी मग अडचणच नाही!