आनंदाची बातमी! भुसावळहून धावणाऱ्या ३८ एक्सप्रेस गाड्यांच्या जनरल डब्यांची संख्या वाढणार…


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Bhusawal Railway Update : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि जनरल वर्गाचे डबे गच्च भरत आहेत. जनरल वर्गातील प्रवाशांच्या जागेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार भुसावळहून धावणाऱ्या ३८ गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या मध्य रेल्वेने वाढवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापैकी 14 गाड्यांना प्रत्येकी दोन डबे आणि 24 गाड्यांना प्रत्येकी एक डबा मिळेल. भुसावळ विभागातून या गाड्या धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळता येणार आहे. नोव्हेंबरपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 14 गाड्यांमध्ये दोन जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.

मुंबई गोंदिया, एलटीटी बनारस एक्सप्रेस, एलटीटी-पाटलीपुत्र, एलटीटी-शालिमार, एलटीटी-हावडा एक्सप्रेस, एलटीटी-पुरी, मुंबई-नागपूर-मुंबई सेवाग्राम, हावडा-मुंबई-हावडा मेल, हावडा-मुंबई हावडा एक्सप्रेस, हटिया-एलटीटी अशी त्यांची नावे आहेत. , हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस, हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेस, रांची हातिया-पुणे एक्सप्रेस.

याशिवाय 24 पॅसेंजर ट्रेनमध्ये एक जनरल डबा जोडावा लागणार आहे. मुंबई-अमृतसर एक्सप्रेस, एलटीटी अयोध्या एक्सप्रेस, एलटीटी- बलिया एलटीटी एक्सप्रेस, एलटीटी जयनगर, एलटीटी-बल्लारशाह, एलटीटी-छापरा एक्सप्रेस, एलटीटी गोरखपूर गोदान एक्सप्रेस, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-सुलतानपूर, एलटीटी- अयोध्या अशी त्यांची नावे आहेत. एक्स्प्रेस, ट्रेनमध्ये पुणे जसदीह पुणे एक्स्प्रेस, पुणे-लखनौ एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे.

Jalgaon Airport : आनंदाची बातमी…जळगाव ते पुणे विमानसेवा आता आठवड्यातून ‘इतके’ दिवस सुरू राहणार!

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.