Bandhkam Kamgar Smart Card Maharashtra : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्मार्ट कार्डचा उपयोग विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे नवीन स्मार्ट कार्डसाठी अर्ज येणे बंद झाले होते, मात्र आता निवडणुकीनंतर पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे स्मार्ट कार्ड कामगारांना घरकुल योजनेसाठी, मुलीच्या लग्नासाठी ₹51,000 चे अनुदान, सेफ्टी किट, किचन सेट आणि इतर फायदे मिळवून देते.
बांधकाम कामगारांचे स्मार्ट कार्ड कसे मिळवायचे?
या कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सोपी आहे. त्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आवश्यक आहे आणि काही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- स्वयंघोषणा
- बँक पासबुक
अर्ज सादर केल्यानंतर रु. भरून अर्ज सक्रिय करावा लागतो. मग काही महिन्यांत तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळेल.
बांधकाम कामगारांच्या स्मार्ट कार्डचे फायदे
- बांधकाम कामगारांसाठी विमा योजनेसह इतर योजनांचा लाभ
- घरकुल योजना
- मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये
- अपघाती मृत्यूवर आर्थिक मदत
- कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती
- बांधकाम कामगारांसाठी विमा योजनेसह इतर योजनांचा लाभ