Baal Aadhaar Update: UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने मुलांच्या आधार कार्डसंदर्भात मोठा बदल केला आहे. जर वेळेत बायोमेट्रिक अपडेट केलं नाही, तर मुलाचं आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकतं.
UIDAI च्या नव्या नियमानुसार, ५ वर्षांखालील वयात बनवलेलं बाल आधार कार्ड, मुलाने ७ वर्षं पूर्ण केल्यानंतर अपडेट करणं बंधनकारक आहे. यामध्ये बायोमेट्रिक तपशील — म्हणजे फिंगरप्रिंट्स आणि आयरिस स्कॅन — घेणं आवश्यक आहे. हे केलं नाही, तर १२ अंकी आधार क्रमांक तात्पुरता बंद होऊ शकतो.
UIDAI कडून नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS पाठवून याबाबत माहिती दिली जात आहे. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर आपल्या मुलाचं बायोमेट्रिक अपडेट करावं, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
Table of Contents
बायोमेट्रिक अपडेट कुठे आणि कसं करावं?
पालक किंवा कायदेशीर संरक्षक जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन हे अपडेट करू शकतात. हे पूर्णपणे मोफत आणि सोपं आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही याबाबत सूचना दिल्या आहेत.
लक्षात ठेवा:
- मुलाचे वय ५ ते ७ दरम्यान असेल आणि आधीच आधार कार्ड बनवलेले असेल, तर बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहे.
- वेळेत अपडेट केल्यास आधार क्रमांक चालू राहील.
- अपडेट न केल्यास कार्ड निष्क्रिय होऊ शकतं.
