नुकसान भरपाई GR 2024 | Ativrushti Nukasan Bharpai GR 2024
2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या लोकांना मदत वाटपासाठी निधी वितरणास मान्यता देण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.
शेती पिकांचे आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी, संदर्भ क्र. १ नुसार शासन निर्णयानुसार विहित दराने एकूण रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून दिली जाईल. 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे कृषी पिके आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
21.02.2024 रोजीच्या शासन आदेश क्रमांकानुसार निधी वितरणासाठी मंजूर केलेली एकूण रक्कम “रू.10664.94 लक्ष (रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट्ट लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त)” ऐवजी “सुधारित रक्कम रू.11239.21 लक्ष (रुपये एकशे बारा कोटी एकोर्चाळीस लक्ष एकवीस हजार फक्त)” रक्कम मंजूर करण्यात आली आहे