—Advertisement—

वार्षिक 3,000 रुपये फास्टॅग पास कसा घ्यावा? दोन वाहनांसाठी एकच पास चालतो का? जाणून घ्या नियम

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 30, 2025
वार्षिक 3,000 रुपये फास्टॅग पास कसा घ्यावा? दोन वाहनांसाठी एकच पास चालतो का? जाणून घ्या नियम

—Advertisement—

Annual Fastag Pass 3000 Rules : वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास जाहीर केला आहे. या पर्यायी योजनेअंतर्गत, कार, जीप, व्हॅन यांसारख्या खाजगी वाहनांसाठी एक वर्ष किंवा 200 फेऱ्यांपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.

या योजनेचे मुख्य फायदे:

  • वार्षिक टोल पास फक्त ₹3,000 मध्ये उपलब्ध
  • 200 ट्रिपपर्यंत कोणताही टोल नाही
  • सरासरी प्रवास खर्च फक्त ₹15 प्रति फेरी
  • अंदाजे ₹7,000 पर्यंतची बचत

महत्त्वाचे नियम:

  • हा पास फक्त एका वाहनासाठी असतो; दुसऱ्या वाहनासाठी वापरता येत नाही.
  • पास फक्त नोंदणीकृत फास्टॅगवरच अ‍ॅक्टिव्हेट होतो.
  • पास मंजुरीसाठी वाहन आणि फास्टॅगची पडताळणी आवश्यक असते.
  • दरवर्षी 1 एप्रिलपासून या योजनेच्या शुल्कात बदल होऊ शकतात.
  • पास बंधनकारक नसून, तो पर्यायी स्वरूपाचा आहे.

फास्टॅग पास कसा खरेदी करावा?
वाहनधारक NHAI ‘राजमार्ग यात्रा’ अ‍ॅप किंवा https://nhai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 2025-26 साठी ₹3,000 भरून हा पास खरेदी करू शकतात. अ‍ॅक्टिव्हेशननंतर SMS द्वारे अपडेट्स मिळतील.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp