Aadhar Card Update 2024 : प्रत्येक केससाठी आधार कार्ड माहिती अपडेट करण्याची मर्यादा वेगळी असते.
Aadhar Card Update 2024 : आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक दस्तऐवज मानले जाते; जे विविध कारणांसाठी वापरले जाते. बँक खाते, महाविद्यालयीन प्रवेश किंवा अनेक प्रकारचे अर्ज यासारख्या अनेक ठिकाणी आधार कार्डचा 12-अंकी युनिक आयडी क्रमांक खूप महत्त्वाचा असतो. अनेकांकडे आधार कार्ड आहे. पण, त्यात आपण आपली माहिती अपडेट करू शकतो का? त्याची मर्यादा काय आहे? हे अनेकांना माहीत नाही.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कार्ड वापरकर्त्यांना आधार कार्ड माहिती अपडेट करण्याची परवानगी देते. पण, त्याला काही मर्यादा आहेत. आज या लेखात आपण आधार कार्डवर एक किंवा दोनदा बदलता येणाऱ्या मर्यादांविषयी जाणून घेणार आहोत.
नाव बदल
नाव बदलण्यावर सर्वात महत्त्वाचे बंधन आहे. आधार कार्ड वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यात दोनदा नाव बदलू शकता. चूक सुधारणे आणि लग्नानंतर आडनाव जोडणे या दोन्ही गोष्टींना हे लागू होते.
लिंग बदल
त्याचप्रमाणे आधार कार्डवर लिंग बदलाची माहिती एकदाच टाकता येईल. तुमचे लिंग अद्ययावत करताना तुम्ही चूक केल्यास, ते पुन्हा बदलता येणार नाही.
अमर्यादित पत्ता बदल
तुमच्या आधार कार्डावरील नाव आणि लिंग बदल वगळता पत्त्यातील बदल आणि अपडेट्सवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा तुम्ही हा बदल करू शकता. जे लोक वारंवार फिरतात त्यांच्यासाठी हे सोयीचे आहे. पाण्याची बिले, वीज बिले किंवा भाडेकरार यांसारखी कागदपत्रे वापरून तुम्ही तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता. वैकल्पिकरित्या तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
संवेदनशील माहिती अपडेट करताना काळजी घ्या
तुम्ही तुमच्या आधार कार्डावरील संवेदनशील माहिती अपडेट करताना काळजी घेणे आवश्यक आहे. जसे
- नाव
- लिंग
- जन्मतारीख
यापैकी एखादी गोष्टही चुकीची ठरली तर त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. तुमची अपडेट विनंती सबमिट करण्यापूर्वी सर्व तपशील दोनदा तपासा.