स्वतःचे घर खरेदी करण्याची संधी, अर्ज प्रक्रिया इथे जाणून घ्या!
Mhada Lottery 2025 Form Process : घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी MHADA कडून आनंदाची बातमी आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडून ५,६३२ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही घरे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी आहेत.
ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्यात घर खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
✅ MHADA Lottery 2025 अर्ज कसा करायचा?
- MHADA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://lottery.mhada.gov.in - ऑनलाईन नोंदणी करा:
- नाव
- मोबाईल क्रमांक
- ईमेल आयडी
- उत्पन्न गटाची माहिती
- लॉगिन करा आणि आपल्याला हवी असलेली योजना निवडा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अनामत रक्कम ऑनलाइन भरावी.
- सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
📋 MHADA Lottery 2025 साठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- डोमेसाईल प्रमाणपत्र (स्थायिकतेचा पुरावा)
- उत्पन्नाचा दाखला (संबंधित गटासाठी)
- बँक पासबुक/स्टेटमेंट
- पासपोर्ट साईझ फोटो
- स्वतःच्या स्वाक्षरीचा फोटो
महत्त्वाचे: सर्व कागदपत्रे PDF किंवा JPEG स्वरूपात अपलोड करावीत.
ℹ️ अधिक माहितीसाठी
👉 https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्या.