१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० हजार शिष्यवृत्ती – अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी!

10th-12th Pass Scholarship Maharashtra : राज्य शासनामार्फत “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” राबवत असलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत १०वी किंवा १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १०,००० रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे –

  • १०वी किंवा १२वी मध्ये ५०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले असतील तर १०,००० रुपयांची शिष्यवृत्ती
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या जास्तीत जास्त दोन मुलांना लाभ
  • शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा

अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी –

  1. विद्यार्थ्याचा पालक MBOCWW (महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळ) कडे नोंदणीकृत असावा.
  2. विद्यार्थी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  3. विद्यार्थ्याला १०वी किंवा १२वी परीक्षेत किमान ५०% गुण आवश्यक.
  4. फक्त दोन पाल्यांना हा लाभ मिळू शकतो.

अर्ज प्रक्रिया –

१. अर्ज डाउनलोड करा

  • https://mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ‘Welfare Scheme’ > ‘Education’ > ’10th to 12th Student’s 10,000/yr’ या पर्यायांतून अर्ज डाउनलोड करा.

२. अर्ज भरा

  • कामगाराची माहिती व विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • बँक तपशील आणि आधार क्रमांक देणे आवश्यक.

३. अर्ज सादर करा

  • सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करा.
  • पावती घेणे विसरू नका.

लागणारी कागदपत्रे –

  • कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्याचा फोटो
  • बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
  • १०वी / १२वीची गुणपत्रिका
  • शाळेचा बोनाफाईड व ७५% उपस्थितीचा दाखला
  • आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, प्रवेश पावती

शिष्यवृत्ती रक्कम तपासण्यासाठी –

  • मंडळाच्या पोर्टलवर “Various Scheme Benefits Transferred” या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा जिल्हा, नाव, बँक खात्याचा तपशील वापरून ‘E02’ स्कीम कोड निवडा आणि तपासा.
इतरांना शेअर करा.......