Pm Dhan Dhanya Yojana Shetkari Upayojan : केंद्र सरकारने “पीएम धन-धान्य कृषी योजना” या नव्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत सहा वर्षांसाठी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही योजना 2025-26 पासून देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे.
ही योजना मुख्यतः नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित आहे आणि देशातील शेती व पूरक क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
Table of Contents
योजनेची प्रमुख उद्दिष्टे:
- कृषी उत्पादकता वाढवणे
- पीक विविधतेला चालना देणे
- शाश्वत शेती पद्धतींचा वापर
- साठवण क्षमता व सिंचन सुविधा वाढवणे
- कर्जपुरवठा सुलभ करणे
- नैसर्गिक व सेंद्रीय शेतीचा प्रचार
- स्थानिक पातळीवर रोजगार व उपजीविकेची साधने निर्माण करणे
योजनेची वैशिष्ट्ये:
- योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे.
- निवडताना कमी उत्पादन, कमी कर्ज वितरण आणि पीक घेण्याची वारंवारता लक्षात घेतली जाईल.
- किमान एक जिल्हा प्रत्येक राज्यातून निवडला जाईल.
- ही योजना 11 मंत्रालयांची विद्यमान 36 योजना एकत्र करून राबवली जाणार आहे.
- खाजगी आणि स्थानिक संस्थांचीही भागीदारी असेल.
अंमलबजावणी कशी होणार?
या योजनेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर समित्या तयार केल्या जातील. जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत शेती व संबंधित उपक्रमांवर आधारित जिल्हा योजना तयार केली जाईल. प्रगती मोजण्यासाठी दरमहा विशिष्ट निकषांनुसार तपासणी होईल.
योजनेचा परिणाम:
- शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ
- शेती आणि पूरक उद्योगात मूल्यवर्धन
- देशांतर्गत उत्पादन वाढ
- आत्मनिर्भर भारतासाठी मजबूत पायाभरणी
टीप: या योजनेमुळे केवळ 100 जिल्ह्यांचा विकास होणार नाही, तर त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही शेतीक्षेत्रात सकारात्मक बदल घडून येणार आहेत.