Ladki Bahin Yojana : सरकारच्या तिजोरीवर ताण, योजना बंद होणार का? जाणून घ्या नेमकं काय घडलं…


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Ladki Bahin Yojana Financial Burden Will It Stop : राज्यातील महिलांसाठी सुरु असलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेमुळे विकासकामांना निधी मिळण्यास उशीर होत असल्याची टीका काही नेत्यांकडून झाली आहे. यावरून ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अलीकडेच मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत याबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की, लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी उशिरा मिळतोय. तर छगन भुजबळ यांनीही ही योजना राज्याच्या तिजोरीवर ताण आणत असल्याचं मान्य केलं आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “होय, या योजनेमुळे आर्थिक ताण नक्कीच येतोय. पण तरीही योजना बंद होणार नाही. गरज असल्यास काही फिल्टरेशन केलं जाईल. पण लाडकी बहीण योजनेला सरकारची बांधिलकी कायम राहील.”

याच कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील समस्यांवरही भाष्य केलं. “शहरात वाहतुकीची अडचण आहे, रस्त्यांची अवस्था चांगली नाही. सामान्य नागरिक सुखाने राहत नाही तोपर्यंत देवेंद्रजी पुणे दौरे करत राहतील,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

इतरांना शेअर करा.......