पशुपालन व्यवसायाला शेतीचा दर्जा; मिळणार सवलती


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Pashupalan Sheti Darja Maharashtra Savalti : महाराष्ट्र सरकारने पशुपालन व्यवसायाला आता अधिकृतपणे शेतीचा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ७६.४१ लाख पशुपालक कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

कृषी क्षेत्रात पशुपालनाचा मोठा वाटा

  • राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा १२% आहे.
  • यातील २४% उत्पन्न फक्त पशुजन्य उत्पादने देतात.
  • मात्र, अजूनही पुरेशा प्रमाणात अंडी, मांस आणि दूध उपलब्ध होत नाही.
  • महाराष्ट्रातील पशुधनाची उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.

पशुपालनाला मिळणार शेतीसारख्या सवलती

  1. वीज दर आता ‘कृषी वर्गवारी’प्रमाणे आकारले जातील.
  2. ग्रामपंचायतीचे कर देखील कृषी दरानेच लावले जातील.
  3. कर्जावरील व्याजदरात ४% सवलत दिली जाईल.
  4. सोलर पंप आणि इतर उपकरणे उभारण्यास अनुदान दिले जाईल.
  5. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर खेळत्या भांडवलासाठी सवलती मिळतील.

निर्णयाचे फायदे

  • राज्यातील ७७०० कोटी रुपयांची आर्थिक वाढ अपेक्षित आहे.
  • निती आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.
  • देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्याने पशुपालन व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे.
इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.