लाडकी बहिण योजना: महिलांचे पैसे थांबले, राम कदम संतप्त


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Ladki Bahin Yojana Paise Thambale Ram Kadam : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत अनेक महिलांना सुरुवातीचे एक-दोन महिनेच आर्थिक लाभ मिळाला असून, त्यानंतर पैसे येणे थांबले असल्याची तक्रार समोर येत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ही बाब विधानसभेत उपस्थित करून सरकारकडे याचे स्पष्टीकरण मागितले.

राम कदम म्हणाले, “घाटकोपरमधील आमदार म्हणून मी स्वतः अनेक घरांमधून अर्ज भरून घेतले. पण आता अनेक महिला माझ्याकडे येऊन सांगत आहेत की, फक्त एका किंवा दोन महिन्यांचेच पैसे आले आणि त्यानंतर पैसे येणे थांबले आहे.”

त्यांनी पुढे म्हटले, “सर्व लाडक्या बहिणींना हे कळावे की त्यांचे पैसे का थांबले आहेत. यासाठी एक संकेतस्थळ असावे, जिथे नाव टाकल्यावर समजू शकेल की पैसे येणार आहेत का, आणि जर येत नसतील तर कारण काय आहे तेही कळले पाहिजे.”

या मुद्यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांकडून ‘शेम शेम’च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राम कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाला. आदित्य ठाकरे यांनी कदम यांचे विधान पटलावरून हटवण्याची मागणी केली.

“या योजनेबाबत आम्ही आधीच फसवणुकीची शक्यता व्यक्त केली होती, तीच बाब आज कदम यांनी सभागृहात मांडली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन,” असा टोला ठाकरे यांनी लगावला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर चर्चा वाढवू नये, असा हस्तक्षेप करून गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.