Da Hike 2025 Kendriya karmachari 59 Percent : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै २०२५ पासून महागाई भत्त्यात (DA) ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ५५ टक्के असलेला DA ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
नुकत्याच जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीनुसार, एआयसीपीआय-आयडब्ल्यू (AICPI-IW) निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे. मे २०२५ मध्ये हा निर्देशांक १४४ वर पोहोचला असून एप्रिलमध्ये तो १४३.५ होता. जूनमध्ये तो १४४.५ च्या आसपास राहिल्यास DA ५८.८५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जे ५९ टक्क्यांपर्यंत वाढीचा मार्ग मोकळा करते.
DA वाढीची अंमलबजावणी जुलैपासून होईल, मात्र याबाबतची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता दरवर्षी दोन वेळा – जानेवारी आणि जुलैमध्ये – अद्ययावत केला जातो. यंदा ही वाढ ७व्या वेतन आयोगाच्या अखेरच्या टप्प्यातील असणार आहे, कारण आयोगाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने ८व्या वेतन आयोगाची घोषणा केली असली तरी त्याबाबत अद्याप कुठलीही ठोस प्रक्रिया सुरू झालेली नाही.