Cet 2025 Engineering Mba Mca Admission Schedule : राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी, तसेच एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) मार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन नोंदणी कालावधी: 28 जून ते 8 जुलै
- कागदपत्र पडताळणी: 29 जून ते 9 जुलै
(छाननी केंद्र किंवा सुविधा केंद्रांवर वेळ ठरवून जावे लागेल. ई-स्क्रुटिनीचा पर्यायही उपलब्ध आहे.) - तात्पुरती गुणवत्ता यादी: 12 जुलै
- हरकती / आक्षेप नोंदवण्याचा कालावधी: 13 ते 15 जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी: 17 जुलै
- नोंदणीची अंतिम तारीख (केवळ Non-CAP जागांसाठी): 8 जुलैनंतर केलेली नोंदणी आणि 9 जुलैनंतर पूर्ण झालेले अर्ज
छाननी केंद्रांची यादी आणि इतर तपशील अधिकृत वेबसाइटवर – https://cetcell.mahacet.org
एमबीए व एमसीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक:
- ऑनलाइन अर्ज नोंदणी: 28 जून ते 8 जुलै
- कागदपत्र पडताळणी: 30 जून ते 9 जुलै
(ई-स्क्रुटिनी किंवा छाननी केंद्राचा पर्याय उपलब्ध) - तात्पुरती गुणवत्ता यादी: 12 जुलै
- हरकती / सूचनांचा कालावधी: 13 ते 15 जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी: 17 जुलै
विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे पालन करून आपली नोंदणी आणि पडताळणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.