—Advertisement—

नवीन पीक विमा योजना: ‘या’ कारणांमुळे नुकसान झाल्यास मिळेल विमा संरक्षण!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 29, 2025
नवीन पीक विमा योजना: ‘या’ कारणांमुळे नुकसान झाल्यास मिळेल विमा संरक्षण!

—Advertisement—

Navin Pik Vima Yojana 2025 : (Crop Insurance Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना टाळता न येणाऱ्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेत खालील प्रकारच्या नुकसानांना कव्हर करण्यात येते:

  1. पेरणी/लावणी/उगम न होणे (Prevented Sowing/Planting/Germination)
    प्रतिकूल हवामानामुळे अधिसूचित क्षेत्रात 75% पेक्षा अधिक भागात पेरणी होऊ न शकल्यास अशा क्षेत्राला विमा संरक्षण मिळते.
  2. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान (Mid-Season Adversity)
    पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस यांसारख्या संकटांमुळे उत्पादनात मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता असल्यास विमा दावा दिला जातो.
  3. पिक उत्पादनातील घट (Standing Crops)
    दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव अशा टाळता न येणाऱ्या घटनांमुळे उत्पादनात घट झाल्यास संरक्षण दिले जाते.
  4. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities)
    गारपीट, विज कोसळणे, ढगफुटी, नैसर्गिक आग यामुळे अधिसूचित पिकाच्या ठराविक क्षेत्रात नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनाम्याद्वारे नुकसान भरपाई दिली जाते.
  5. काढणीनंतर नुकसान (Post-Harvest Losses)
    काढणीनंतर 14 दिवसांच्या आत बिगरमोसमी पावसामुळे किंवा गारपीट, चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यास, पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई मिळते.
  6. अपवाद
    युद्ध, अणुयुद्ध, हेतुपुरस्सर नुकसान किंवा टाळता येण्यासारख्या धोक्यांसाठी विमा संरक्षण दिले जाणार नाही.
Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp