Pik Vima Update 2025 : यंदाच्या खरीप हंगामासाठी पीकविमा हप्ता भरताना शेतकऱ्यांना यावर्षी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. यामागे अनेक कारणं आहेत – विशेषतः काही शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देत विमा घेतल्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
फसवणुकीची प्रकरणं उघड
- पेरणी न करता विमा भरणे
- एक एकर पेरणी करून चार-पाच एकरांसाठी विमा भरने
- बनावट सातबारा वापरणे
- शासकीय जमिनीवर विमा भरणे
अशा प्रकारांमुळे सरकारने एक रुपयात पीकविमा देण्याची योजना बंद केली आहे.
वाढलेला हप्ता आणि कडक अटी
- आता शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा अधिक भरावा लागेल.
- नुकसानभरपाई केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित असेल.
- अतिवृष्टी, सततचा पाऊस किंवा अन्य कारणांनी नुकसान झाल्यास भरपाई दिली जाणार नाही.
- २४ जून रोजी ४९९ पानांचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे.
विमा हप्ता दर (प्रति हेक्टर):
- ज्वारी: ₹70.44
- बाजरी: ₹76.35
- भुईमूग: ₹95.25
- सोयाबीन: ₹1000
- मूग: ₹70
- उडीद: ₹500
- तूर: ₹744.36
- मका: ₹540
- कांदा: ₹680
सरकारी हिस्सा व विमा कंपनी
- केंद्र व राज्य शासन फक्त सोयाबीन (₹5750) व मूग (₹375) साठी हिस्सा भरणार.
- इतर पिकांसाठी पूर्ण हप्ता शेतकऱ्यालाच भरावा लागेल.
- यावर्षी ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ ही खरीप व रब्बी हंगामासाठी नेमण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
- विमा भरायच्या पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.
- फार्मर आयडी अनिवार्य आहे.
- अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.