Pushpa 2 : The Rule : सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत गायब होणार ‘पुष्पा २‘चा हा सीन
![](/wp-content/uploads/2024/10/hq720-2.jpg)
Pushpa 2: The Rule : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा’ ने सर्व प्रेक्षकांना प्रभावित केले. पहिल्या चित्रपटानंतर आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट पाहण्यासाठी आता फक्त चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.