जामनेर : 28 नोव्हेंबर या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सत्यशोधक समाज संघ शाखा जामनेर तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभाला मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक समाज संघातर्फे संघाचे कार्यकर्ते कैलास महाजन यांनी प्रास्ताविक सादर केले.प्रास्ताविकेत आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आणि सत्यशोधक समाज संघ विषयी माहिती सांगण्यात आली.तीस नोव्हेंबरला दोन दिवसीय होऊ घातलेल्या सत्यशोधक संघाचे राज्य अधिवेशनाची माहिती सांगून सर्वांना अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले.
सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा सचिव रमेश वराडे यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्य धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक विधी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. लवकरच जामनेर शहरात सार्वजनिक सत्य धर्मावर आधारित विधी प्रशिक्षण शिबिराच्या आयोजन करण्यात येईल अशी माहिती दिली.
जामनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गोरे यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आलेले स्व-अनुभव कथन केले तसेच समाजात काम करताना वेगवेगळ्या अडचणींवर मात करून कशी वाटचाल करावी याचे अनमोल असे मार्गदर्शन केले.यानंतर सुभाष माळी, दिपक माळी,नरेंद्र पाटील यांनी आपले मनोगत सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर तायडे यांनी छत्रपती शिवरायांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती सांगितली.
सत्यशोधक समाज संघाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.बी.चौधरी यांनी आपल्या मनोगत महात्मा फुले यांना अपेक्षित असलेल्या सत्यशोधक समाज संघ समजावून सांगितला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अनिल माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करत इथून पुढे आमच्या घरी सर्व विधी सत्यशोधक समाज संघाच्या मार्गदर्शनाने पार पडतील असे आश्वासन दिले.उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी कार्यक्रमासाठी पवन माळी,प्रविण तायडे,सदाशिव चवरे,दिपक अहिरे यांचेसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.